पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून चित्रपटाचं प्रमोशन

पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून चित्रपटाचं प्रमोशन

नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Published by :
shweta walge

सचिन बडे, छ.सभाजीनगर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणारे राजकारणी म्हणजे नितीन गडकरी. आता नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. तर आज पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून चित्रपटाचा प्रमोशन करण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बहुचर्चित असणारा खळग चित्रपट हा राज्यभरामध्ये प्रदर्शित होत असताना या चित्रपटाचे ऑफिशियली प्रमोशन केले. गरीब घरातील कुटुंबीयांच्या परिस्थितीची जाणीव आणि पोटाचं खळग भरण्यासाठी केलेली धडपड या चित्रपटातून दाखवली असून नक्कीच हा चित्रपट समाजाचा चेहरा दाखवणार असेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित गडकरी या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com