मुलाखतीत गौप्यस्फोट; बंडाच्या एक महिनाआधीच शिंदे मुख्यमंत्री होणार हे फिक्स होतं

मुलाखतीत गौप्यस्फोट; बंडाच्या एक महिनाआधीच शिंदे मुख्यमंत्री होणार हे फिक्स होतं

गेल्या वर्षी तेव्हा नगरविकासमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली.
Published by :
Siddhi Naringrekar

गेल्या वर्षी तेव्हा नगरविकासमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली. त्यानंतर अनेक प्रश्न पडले. अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.

याच पार्श्वभूमीवर आता एका मुलाखतीतून एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे सचिव आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी अकोला-बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीतून नितीन देशमुख यांनी मोठे गौप्यस्फोट केलं आहे. नितीन देशमुख म्हणाले की, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांना फक्त माहिती होतं की मुख्यमंत्री होणार. फडणवीसांना सत्तांतर होणार हे माहिती होतं. पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहिती नव्हतं.

तसेच सत्तांतर होण्याच्या एक महिनाआधी आम्हाला हे माहिती होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. स्वत: एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं होतं की, मी मुख्यमंत्री होणार आहे. असे नितीन देशमुख म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com