Ravindra Waikar
Ravindra Waikar

रवींद्र वायकरांचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र', शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'वर्षा'वर पोहोचले

वायकरांच्या शिंदे गटाच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

उद्धव ठाकरे गटातील जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर एकनाथ शिंदे गट (शिवसेनेत) प्रवेश करणार आहेत. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वायकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. एक खडा बाजूला गेला म्हणून शिवसेनेचा गड ढासळत नाही, असं म्हणत ठाकरेंनी गोरेगावच्या सभेत वायकरांवर नुकतीच टीका केली. परंतु, रवींद्र वायकर आता ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रेवश करणार असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

वायकरांच्या शिंदे गटाच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय.अंधारे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या, "वायकर साहेबांना त्यांच्या पक्षप्रवेशानिमित्ताने मी खूप शुभेच्छा देते. किरीट सोमय्या यांचं उत्तर यावर काय असेल, कारण प्रत्येकाला ब्लॅकमेल करायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं. ही ब्लॅकमेलिंग भाजपमध्ये किती दिवस चालणार आहे. त्यांना काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व लोकांना ब्लॅकमेल करुन घ्यावं लागतं. भाजपकडे एकही नेता शिल्लक नाही. देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षात नेते घडवू शकत नाहीत, हेच या पक्षप्रवेशातून सिद्ध होतंय."

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com