Rohit Pawar
Rohit Pawar

"...तर कांद्याची माळ घालून मोदींचं स्वागत करा"; नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेपूर्वी आमदार रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. परंतु, मोदींच्या या सभेपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
Published by :

Rohit Pawar Tweet Viral : नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. परंतु, मोदींच्या या सभेपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. मोदी नाशिकमध्ये येणार आहेत, म्हणून कांदा उत्पादकांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. पवारांनी एक्सवर ट्वीट करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिंदे साहेब ,फडणवीस साहेब ,अजितदादा यांच्यामध्ये हिंमत आणि शेतकऱ्यांबद्दल कळवला असेल, तर कांद्याची माळ घालून मोदिजींचे स्वागत करावे, असं ट्वीट करत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्वीटरवर रोहित पवार काय म्हणाले?

मोदी साहेब नाशिकमध्ये सभा घेणार आहेत, म्हणून कांदा उत्पादकांना नोटीसा दिल्या जात आहेत. काहींना तर अटकही करण्यात आली आहे. निर्वीवाद सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते, तर कदाचित ही वेळ आली नसती. शिंदे साहेब ,फडणवीस साहेब ,अजितदादा यांच्यामध्ये हिंमत आणि शेतकऱ्याबद्दल कळवला असेल, तर कांद्याची माळ घालून मोदिजींचे स्वागत करावे,गरज पडली तर प्रफुल्ल पटेल यांच्याहस्ते मोदिजींचे स्वागत करावे.

असो ,राज्यातले नेते फुसके बार असले तरी, मोदी साहेबांची कांद्याच्या प्रश्नापासून दूर पळण्याची इच्छा असली, तरी महाराष्ट्रातला उध्वस्त झालेला शेतकरी बघून मोदी साहेबांचा टेलेप्रोम्प्टर तरी कांद्याबद्दल एखादा शब्द बोलेल ही अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com