इतर राज्यातील आमदारही आमच्याच सोबत; अजित पवार गटाचा दावा

इतर राज्यातील आमदारही आमच्याच सोबत; अजित पवार गटाचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोग कार्यालयात दाखल झाले आहेत.
Published by :
shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोग कार्यालयात दाखल झाले आहेत. याच सुनावणीवरुन अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्याचं म्हटलं आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

तटकरे म्हणाले की, प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी जे मुद्दे उपस्थित होतील, तेव्हा आम्ही भूमिका मांडत राहू. बहुतांश आमदार आमच्यासोबत आहेत. एवढंच नाही तर राज्यातील पदाधिकाऱ्यांनीदेखील अजित पवारांना समर्थन दिले आहे.

पुढे म्हणाले की, फक्त राज्यातीलच नाही तर नागालँडच्या ७ आमदारांनी मुंबईत येऊन आम्हाला समर्थन दिलं आहे. सुनावणीत जे मुद्दे येतील, त्याची उत्तरं आमच्याकडे आहेत. जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात काय याचिका दाखल केली आहे, ते आम्हाला माहिती नाही.

इतर राज्यातील आमदारही आमच्याच सोबत; अजित पवार गटाचा दावा
सुनावणीपूर्वी प्रफुल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com