सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज अजित पवार यांच्यासोबत सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज अजित पवार यांच्यासोबत सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही सर्वजण आलो. सर्वांनी दर्शन घेतलं. अधिवेशनाच्या कालच्या दिवसात काही काम झालं नाही. त्यामुळे कालची, आजची काम उरकायची आहेत. आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो.

व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललो आहे. आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत. त्याठिकाणी जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावेत. सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, शेवटी जनताजनार्दन सर्वकाही असते. मतदार राजा आहे. आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याकरता त्यांच्यासमोर जाणार आहोत. परंतु या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते. तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे. योग जुळून आलेला आहे. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com