ठाकरे गटाचे आमदार रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांची भेटतात; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

ठाकरे गटाचे आमदार रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांची भेटतात; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

शिंदे सरकार ठाकरे गटाला वारंवार धक्के देत आहे.

शिंदे सरकार ठाकरे गटाला वारंवार धक्के देत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एक वक्तव्य केलं असून या वक्तव्याने चर्चांना उधान आले आहे. सुप्रिया सुळे-अब्दुल सत्तार वादावरून आधीच महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गट आमने-सामने आले आहेत.

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदारच नाही, तर अनेक खासदारही अस्वस्थ आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री-बेरात्री भेटत असतात. तसेच आमच्या अनेक मंत्र्यांचीही सह्यांद्रीवर जाऊन भेटत घेतात. हे मी स्वत: अनुभवलं आहे”, असे त्यांनी वक्तव्य केलं आहे. आता प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com