Sion Bridge : मुंबईत मनसेचं आक्रमक; सायनचा पूल पाडल्याविरोधात आंदोलन

त्यामुळे त्याठिकाणी अनधिकृत पार्किंगचा देखील इथे त्रास होतो. दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • सायन धारावी येथील ब्रिजचे पाडकाम झाल्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजवर होणाऱ्या गर्दी विरोधात मनसे आक्रमक

  • या ब्रिज वर गर्दी होत असल्याने सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे...

  • या परिस्थितीत मार्ग काढत लहान मुलांना घेऊन पालकांना जावं लागतं असल्याचा मनसेचा आरोप..

  • अशातच एलफिस्टन स्थानका प्रमाणे चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे... मात्र या सगळ्या बाबत महापालिका किव्हा रेल्वे काही उपाययोजना करत नसल्याचा आरोप..

  • या परिस्थिती च्या विरोधात प्रशासनाला जाग आणण्यासाठी मनसे कडून आंदोलन केले जात आहे.

(MNS Protest) धारावी सायन्सच्या रेल्वे ब्रिजचे बांधकाम सुरु आहे. पण ते बांधकाम अर्धवट झालेले आहे रेल्वे ब्रिजवर लाईट देखील नसतात. त्यामुळे त्याठिकाणी अनधिकृत पार्किंगचा देखील इथे त्रास होतो. दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे . एलपीस्टन ब्रिज प्रमाणे इथे चेंगराचेंगरीची घटना काल होता होता वाचली असती असा आरोप मनसे केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या ब्रिजचं काम पूर्ण करा अशी मागणी म्हणजे तर्फे करण्यात आली असून आठ ते दहा दिवसात पूर्ण झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com