Raj Thackeray
Raj ThackerayLokshahi News

मनसेने चक्क शिवसेना भवनासमोरच...!

मनसे विरूद्ध महाविकासआघाडी (MNS Vs. MVA Goverment) हा संघर्ष चांगलाच पेटताना दिसत आहे. तर, दुसरीकडे मनसेने हिंदूत्त्वाचा मुद्दा जवळ केल्याने भाजप (BJP in favour of MNS) मात्र मनसेच्या समर्थनार्थ वक्तव्य केली जात आहेत
Published by :
Vikrant Shinde

गुढीपाडव्यादिवशी झालेल्या मनसेच्या मेळाव्यानंतर (MNS GudhiPadwa Melawa) राज्यातील राजकारण हे चांगलंच ढवळून निघालं आहे. विशेषत: मनसे विरूद्ध महाविकासआघाडी (MNS Vs. MVA Goverment) हा संघर्ष चांगलाच पेटताना दिसत आहे. तर, दुसरीकडे मनसेने हिंदूत्त्वाचा मुद्दा जवळ केल्याने भाजप (BJP in favour of MNS) मात्र मनसेच्या समर्थनार्थ वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आज (10-04-2022) रामनवमी दिवशी मनसेने दादर येथील शिवसेना भवनासमोर हिंदुत्त्ववादी गाणी (Hinduistic Songs) लावली.

शिवसेना भवनासमोर मनसेचा भोंगा:

मनसेने रामनवमी दिवशी सकाळीच शिवसेना भवनाबाहेर भोंगा लावून त्यावर हनुमान चालिसा तसेच प्रभू श्रीरामांची गाणी लावून पुन्हा एकदा शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, याप्रसंगी भोंग्यावर गाणी वाजवली म्हणून यशवंत किल्लेदार यांच्यासह काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ह्यामुळे, मनसे आता कट्टर हिंदुत्त्वाकडे वळता-वळता महाविकासआघाडी व विशेषत: शिवसेनेवर (MNS Vs. Shivsena) निशाणा साधत राहणार असं दिसतं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com