MNS Morcha Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांची पोलिसांनी सोडलं, मनसेची भूमिका काय?
भाषेवरून झालेला मराठी-गुजराती वादाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका मिठाई दुकानदाराला मारहाण केली होती. यानंतर 3 तारखेला परिसरातील व्यापाऱ्यांनी याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. यात जय मारवाडी, जय गुजराती अशा घोषणा देखील देण्यात आल्या. आता याच्याविरोधात समाजात तेढ निर्माण केल्याने "मराठी एकजूट" हा "मराठी मोर्चा" काढण्यात आला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सकाळी 10 वाजता निघणार होता. परंतु त्याआधीच अविनाश जाधवांना ताब्यात घेतलं गेलं. मीरा-भाईंदरमध्ये आज 8 जुलैला मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सकाळी 10 वाजता निघणार होता. मात्र त्यांना मोर्च्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तसेच मनसेच्या मोर्च्यासाठी परवानगी देखील नाकारण्यात आली. त्यावरुन आता मनसे कार्यकर्ते संतापलेले पाहायला मिळत आहेत.
यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेने या नोटिशांचा तीव्र निषेध करत, पोलिसांवर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या प्रयत्ननांमुळे मराठी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याचपार्श्वभूमिवर अनेक नेत्यांनी देखील यावर आपली प्रतिकिया दिली आहे. तर आता मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडल आहे.