Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक! सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थ निवासस्थानी बोलवल अन्...
मनसे नेते राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना तातडीने शिवतीर्थ येथे बोलावून घेतले. 1 नोव्हेंबरला काढल्या जाणाऱ्या मोर्चाचे नियोजन आणि निवडणूक बाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरे शिवतीर्थ येथे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
यावेळी मनसेचे सर्व शहरप्रमुख आणि जिल्हा प्रमुख, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आसपास परिसरातील महत्वाचे नेते पदाधिकारी यांना राज ठाकरे यांनी बोलावून घेतलं आहे. निवडणूक आयोगाच्या कारभार विरोधात 1 नोव्हेंबर रोजी मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठीच राज ठाकरे यांनी ही बैठक बोलवल्याचं म्हटलं जात आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र मिळून निवडणुक लढवण्याबाबत देखील या बैठकीत काही चर्चा होते का? ते पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

