MNS
MNS

MNS : निवडणुकीच्या धामधुमीत मनसेला खिंडार: पुण्यात प्रभाग २४ मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(MNS) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.तसेच उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत कोणी राजीनामा दिला तर कोणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली.

काही जणांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर आता या निवडणुकीच्या धामधुमीत मनसेला खिंडार पडल्याचे पाहायला मिळत असून पुण्यात प्रभाग २४ मधील मनसेच्या अनेक सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मनसेचे उपविभाग अध्यक्ष रवी (बंडू) भोसले, शाखा अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्यासह प्रीतम गायकवाड, योगेश पाष्टे, अजय चव्हाण आणि संतोष टिळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Summary

  • निवडणुकीच्या धामधुमीत मनसेला खिंडार

  • पुण्यात प्रभाग २४ मधील मनसेच्या अनेक सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com