Raj Thackeray :  'हिंदी नाही म्हणजे नाहीच' सरकारला थेट इशारा! राज ठाकरेंचा हिंदीसक्ती विरोधात 6 जुलैला मोर्चा

Raj Thackeray : 'हिंदी नाही म्हणजे नाहीच' सरकारला थेट इशारा! राज ठाकरेंचा हिंदीसक्ती विरोधात 6 जुलैला मोर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी हिंदीसक्ती विरोधात 6 जुलैला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Published on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी हिंदीसक्ती नको या विषयावर जोर धरुन ठेवल्याचं पाहायला मिळालं. त्याचसोबत राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची देखील भेट घेतली. राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच राज्यात सुरु असलेल्या शैक्षणिक धोरण बद्दल आपली मत मांडली आहेत.

राज्य सरकारच्या अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी हिंदी अनिवार्य नसली तरी, हिंदी ऐवजी विद्यार्थ्यांनी इतर कोणतीही भाषा तृतीय म्हणून शिकायची असेल तर त्याला मान्यता दिली जाईल. असं शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलं होत. यावर राज ठाकरेंनी आपला तीव्र नकार दिल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच हिंदीसक्तीला विरोध दर्शावला आहे. यादरम्यान राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेत हिंदीसक्ती विरोधात 6 जुलैला गिरगाव चौपाटीपासून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मोर्च्याला सहभागी होण्यासाठी सर्व राजयकीय पक्षांना राज ठाकरेंनी आव्हान दिलं आहे.

याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले की, " शिक्षण मंत्री दादा भुसे येऊन गेले, त्यांनी जी भूमिका मांडली ती मी संपूर्ण फेटाळून लावली. धोरणात या गोष्टी नाहीत हे त्यांनी मान्य केले. त्यांच्याकडे माझ्या काही प्रश्नांची उत्तरे नव्हती. ते त्याच त्याच गोष्टी बोलत होते. खरतर 5 वी नंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे, त्यांना हेही सांगितले की NEP मध्ये असे काही नाही हे राज्यांवर टाकले आहे, मग ते का करत नाहीत".

"मी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करत आहे कि 6 जुलै ला गिरगांव येथे मोर्चा काढत आहोत. त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल. कारण तो मराठी माणसाचा मोर्चा असेल. सर्व विद्यार्थी, पालक यांनी सहभागी व्हावे. या मोर्चात कोण कोण येते हे मला पाहायचे आहेच, त्याचसोबत कोण कोण येणार नाही हे सुद्धा मला पाहायचे आहे. देशात संघ राज्य पद्धती आहे. सगळ्या भाषा असताना त्रिभाषा सुत्री का? तुम्ही जबरदस्ती का करत आहे. सगळे कलाकार मुंबईत मोठे झाले. त्यामुळे सर्व साहित्यिक, मराठी प्रेमी, सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावं".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com