Raj Thackeray
Raj Thackeray Team lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिर्डी दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर जाणार आहेत. शिर्डी येथे साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी येत असून त्यांच्या स्वागतासाठी मनसे सैनिक सज्ज झाले असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर जाणार आहेत. शिर्डी येथे साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी येत असून त्यांच्या स्वागतासाठी मनसे सैनिक सज्ज झाले असल्याची माहिती मिळत आहे.

राज ठाकरे यांचे 1 ऑक्टोबर रोजी काकडी विमानतळावर आगमन होणार असून त्या ठिकाणी त्यांचे मनसे सैनिकांकडून स्वागत करण्यात येणार आहे. स्वागत झाल्यानंतर ते 8.30 वाजता साईबाबा समाधी मंदिर येथे येऊन दर्शन घेणार आहेत. दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थान येथील व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

त्यानंतर ते पुढील दौर्‍यावर रवाना होणार असून शिर्डीत ते फक्त दीड तास थांबणार आहेत. महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय घडामोडीनंतर तसेच भाजप व शिंदे गटाचे राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रथमच शिर्डी दौर्‍यावर येत असल्याने प्रसारमाध्यमांशी काय संवाद साधणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com