Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'या' दिवशी रत्नागिरीत सभा

सभेच्या ठिकानासाठी आज प्रमुख पदाधिकारी यांची रत्नागिरीत बैठक
Published by :
Siddhi Naringrekar

निसार शेख, रत्नागिरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा ६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पार पडणार आहे.सभेच्या नियोजनासाठी शुक्रवारी दि २१ एप्रिल २०२३ रोजी रत्नागिरी येथील शासकीय विश्राम गृहात दुपारी २:०० वाजता मनसेच्या प्रमुख नेत्याची बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे यांनी डिसेंबरमध्ये पार पडलेल्या कोकण दौऱ्यात लवकरच रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते.

या बैठकीला मनसे नेते शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, मनोज हाटे तसेच रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर उपस्थित राहणार आहे, या बैठकीत राज ठाकरे यांच्या सभेसाठी मैदानाची जागा निश्चित करण्यात येणार असून सभेला येणाऱ्यांची कशा प्रकारे व्यवस्था करावयाची या संदर्भात बैठक पार पडणार आहे.

तसेच नियोजित सभेसाठी जबाबदाऱ्या सुद्धा वाटून देण्यात येणार आहे.मात्र या बैठकीला राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर उपस्थित राहणार नसल्यामुळे वेगवेगळया चर्चेला उधाण आले आहे तसेच या बैठकीला रत्नागिरी जिल्हयातील सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांनी वेळेवर उपस्थित राहावयाचे आहे असे आदेश देण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com