Raj Thackeray  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच नेतेमंडळी देखील दौरे करू लागले आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

ठाणे : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच नेतेमंडळी देखील दौरे करू लागले आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येणार आहे. टेंभीनाका भागातील एका कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो आहे.

राज ठाकरे हे आज ठाणे येथील टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहे. राज हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमानंतर ते शहरात दोन ठिकाणी भेटी देणार आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या महिनाभरातील हा दुसरा ठाणे दौरा आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे दौरे राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जात आहेत. ठाणे येथील टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्यालय आहे.

याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष बा‌ळासाहेबांची शिवसेना याचे कामकाज चालते. त्यामुळे टेंभीनाका परिसर हा संपुर्ण जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. यातच राज ठाकरे हे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी करत आहे. तर त्यांचा आजचा ठाणे दौरा देखील चर्चेचा ठरणार आहे.

राज यांचा आजचा कार्यक्रम दौरा

टेंभीनाका परिसर भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात राहत असून या समाजाचे या भागात मंदीर आहे. या मंदीरामध्ये जैन समाजाच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज यांच्या दौऱ्याची तयारी ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com