Raj Thackeray : "आशिष झोलर...", म्हणत संदीप देशपांडे यांची आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका
शिवतीर्थावर आज राज ठाकरे यांचा गुढी पाडवा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. सभेच्या आधी मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाषण केले आहे. यावेळी संदीप देशपांडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. मुंबई शहराची बकाल अवस्था झाली आहे. रस्ते खोदले आहेत, महापालिकेचा बट्ट्याबोळ झाला आहे. परप्रांतीयांची दादागिरी वाढताना दिसत आहे. मराठी बोलणार नाही, अशी भाषा वापरत आहेत कल्याण मध्ये मराठी माणसाला मारहाण करणारे लोक होते. सोसायटीमध्ये दादागिरी करणारे लोक आहेत. महाराष्ट्र व मुंबईची भाषा ही मराठीच आहेअसा मुद्दा संदीप देशपांडे यांनी मांडला आहे.
पुढे संदीप देशपांडे म्हणाले की, "मध्यंतरी गुढीपाडवा मेळाव्याआधी एका कार्यकर्त्याने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला. आता बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, असे उद्धव ठाकरे बोलले. एक फोटो लावला, तर मनाला लागले तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का?"
भ्रष्टाचार झाला असं आदित्य ठाकरे सगळीकडे ओरडत फिरत आहेत . हो झाला. 6 मारवाडी कंत्राटदार तुमच्या वेळी होते ते शिवसेनेचे जावई होते का? असा सवालदेखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. मराठी कंत्राटदार किंवा कंपनीला काम का दिली नाहीत? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
याचवेळी संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 2019 पर्यंत याच भाजपची चड्डी संजय राऊत तुम्ही घालत होतात ना तेव्हा ही चड्डी तुम्हाला आवडत होती ना?
काही लोक जाणीवपूर्वक राज ठाकरेंबाबत विचित्र पद्धतीने बोलत असतात. त्यांच्या साठी एक कविता केली . "लागली बत्ती, पार्श्व भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला, बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला, मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा". दरम्यान याचवेळी संदीप देशपांडे यांनी आशिष शेलारांवर कवितेतून आशिष झोलार म्हणत केली टीका