शिराळा येथील खटल्यात राज ठाकरे यांचा अजामीनपात्र वॉरंटचा हुकूम रद्द
संजय देसाई, सांगली
मुंबई मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाली म्हणून मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सांगली जिल्ह्यातल्या शेडगेवाडी येथे २००८ मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनाचा खटला शिराळा न्यायालयात गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरे, शिरीष पारकर यांच्या सहित अन्य आरोपींना न्यायालयाने अटक वॉरंट काढलं होतं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सह दहा जणांनी सुनावणी च्या वेळी अनुपस्थित राहण्याचा विनंती न्यायालयात केली होती. न्यायालयाने राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांचा अजामीनपात्र वॉरंट चा हुकूम रद्द करण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणीस हजर राहण्याच्या अटीवर अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. मात्र अन्य आठ जणांना अजामीनपात्र वॉरंट चा हुकूम काढला आहे. पुढील सुनावणी दि. ४ फेब्रुवारी अशी नेमली आहे.