MNS विरोधात बॅनर लावण्याचं 'समाधान'; तर बॅनर उतरवून मनसेचे सडेतोड उत्तर

महाकुंभमेळ्याचे वैशिष्ट्य विषद करत लावण्यात आलेला बॅनर मनसेने काही तासातच उतरवला.
Published by :
Rashmi Mane

गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभातील पवित्र स्नानावर भाष्य करत गंगा नदीचे विदारक चित्र दाखवले होते. त्याला प्रत्युत्तर देत माजी नगरसेवक शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी आज सकाळी शिवसेना भवनासमोर भव्य स्वरुपात बॅनर लावून महाकुंभाचे वैशिष्ट्य विषद करत मनसेला डिवचलं. यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर काही तासातच हे बॅनर उतरवून सरवणकरांना सडेतोड उत्तर दिले. महापालिका प्रशासनाने हे बॅनर उतरवले.

बॅनरबाजीवर समाधान सरवणकरांची भूमिका

शिवसेना पक्षाचे नेते समाधान सरवणकर यांनी तब्बल १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभाचे वैशिष्ट्य दर्शवणारा मजकूर बॅनरवर नमूद केला होता. यावेळी सरवणकर म्हणाले की, "हिंदू एकजूट झालेला आहे, जेव्हा हिंदू एकजूट होते, तेव्हा त्यांना टार्गेट केले जाते. हिंदूबद्दल अप्रचार केला जातो, हिंदू दुखावले जातात, यात विघ्न आणण्याचे काम काही नेते करतात. मात्र हिंदू एकजूट अशीच राहिले पाहिजे. आपली भूमिका नेहमी बदलत राहिलात, तर जनता हुशार आहे. मराठी, हिंदू, गुजराती अशा भूमिका बदल्या जातात. मराठी मतदार खूप हुशार झाली आहे. त्यांचे जे काही नेते आहेत, ते मराठी भाषेसाठी लढतात. मात्र त्यांची मुले मराठीत शिकले आहेत का?, विषय भरकटला जातोय. निवडणूक आली की मतांचं राजकारण केले जाते. संतोष धुरी मोठे नेते झाले पण त्यांना अजून तिकीट ठरत नाही. दरवेळी गुढीपाडव्याला असे विषय काढायचे. कुंभमेळ्यावर वारंवार टीका करून काय साध्य करायचे आहे?," असा आरोप समाधान सरवणकर यांनी यावेळी केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com