Sandip Deshpande
Sandip DeshpandeTeam Lokshahi

कोरोना काळात पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सापडले, सोमवारी करणार उघड - संदीप देशपांडे

कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आणि पेन ड्राईव्ह हाती आल्याचे वक्तव्य मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केलं आहे.

कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आणि पेन ड्राईव्ह हाती आल्याचे वक्तव्य मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केलं आहे. कोरोना काळात पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सापडले असून ते सोमवारी जाहीर करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे वक्तव्य त्यांनी केलं. संदीप देशपांडे म्हणाले की, आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह ठेवून गेला. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आहेत. मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही मी सोमवारी जाहीर करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com