मनसेने मला पाठिंबा द्यावा,मनसेचा एक आमदार वाढेल; हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांची राज ठाकरेंकडे मागणी

मनसेने मला पाठिंबा द्यावा,मनसेचा एक आमदार वाढेल; हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांची राज ठाकरेंकडे मागणी

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.महाविकास आघाडी आणि भाजपाने आपले उमेदवारी जाहीर केले असून, २६ फेब्रुवारीला या दोन्ही जागेसाठी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांची राज ठाकरेंकडे मागणी केली आहे की, कसबा विधानसभा पोट निवडणूकीमध्ये मनसेने मला पाठिंबा द्यावा म्हणजे मनसेचा एक आमदार वाढेल असे ते म्हणाले.

सन्माननीय राज साहेब यांनी मनसे च्या कार्यकर्त्यांनी कोणाचाही प्रचार करू नये असा आदेश काढला आहे. मात्र आनंद दवे म्हणाले की, राज साहेब आणि आमच्या भूमिका सारख्याच आहेत. समर्थ रामदास स्वामी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयची आमची मते सारखीच आहे. त्यांच आणि आमचं हिंदुत्व आक्रमक आहे, आरक्षणाची भूमिका सारखीच आहे.

तसेच मनसे ने कसबा निवडणूकीत मला पाठिंबा दिला, तर माझा विजय सुकर होईल, माझं मताधिक्य वाढेल. इतर कोणत्याही पक्षा बरोबर जाऊन किव्वा तटस्थ राहून मनसे ला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे सन्माननीय राज साहेबांनी याचा विचार करावा. असे आनंद दवे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com