Konkan Graduate Constituency : कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार

Konkan Graduate Constituency : कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार

कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेने माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेने माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. अभिजीत पानसे निवडणुकीचा अर्ज भरणार नाही आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता अभिजीत पानसे निवडणुकीचा अर्ज भरणार नसल्याची माहिती मिळत आहे. अभिजित पानसे यांचे नाव मागे घेण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजप अर्ज भरणार असल्याचे समजते आहे. अर्ज भरण्याआधी डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com