Local Body Elections : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेनंतर राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
थोडक्यात
राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता
आयोगाने निवडणुकीची घोषणा केली तर विरोधक काय भूमिका घेणार?
विश्वसनीय सूत्रांनुसार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपल्यानंतर राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर आता वेळेचे बंधन आले असून, निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आज सर्वाधिक मानली जात आहे.
या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिका या सर्व संस्थांची मुदत संपल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहे.
Municipal Election: महापालिकांची निवडणूक
छ.संभाजीनगर
नवी मुंबई
वसई विरार
कल्याण-डोंबिवली
कोल्हापूर
नागपूर
ठाणे
सोलापूर
मुंबई
अकोला
अमरावती
पिंपरी-चिंचवड
नाशिक
पुणे
उल्हासनगर
चंद्रपूर
परभणी
लातूर
भिवंडी-निझामपूर
मालेगाव
पनवेल
मीरा-भायंदर
नांदेड-वाघाळा
सांगली-मिरज-कुपवाड
जळगाव
अहिल्यानगर
धुळे
इचलकरंजी
जालना
Zilla Parishad Election: जि.प.निवडणूक
धुळे
नंदुरबार
नाशिक
पालघर
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
ठाणे
अहिल्यानगर
कोल्हापूर
पुणे
सांगली
सातारा
सोलापूर
छ.संभाजीनगर
बीड
या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट, शिवसेना (उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मतदार घोळासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विरोधकांनी दाद मागितली होती. निवडणूक आयोगांची भेट देखील घेतली होती. मतदार यादीच्या घोळाबाबत मनसे आणि महाविकास आघाडीने संयुक्त सत्याचा मोर्चा देखील काढला होता. मतदार यादीत घोळ आहेत. याचे पुरावे देखील समोर ठेवले होते. मात्र आता आज आयोगाने निवडणुकीची घोषणा केली तर विरोधक काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
