Modi In Mumbai : मोदींचा मुंबई दौरा, दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त; अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद

Modi In Mumbai : मोदींचा मुंबई दौरा, दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त; अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद

मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान Narendra Modi उद्या, १७ फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान Narendra Modi उद्या, १७ फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या सोबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांचीही उपस्थिती असणार आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान मोदी दुपारी २.१५ वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर २.३० वाजता लोकभवन येथे मोदी आणि मॅक्रोन यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता हॉटेल ताज येथे दोन्ही नेते विविध उद्योगसमूहांच्या सीईओंसोबत राऊंडटेबल चर्चेत सहभागी होतील. यानंतर सायंकाळी ६.३० वाजता ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात भव्य इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.

दक्षिण मुंबईतील हे मार्ग बंद

  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव खालील मार्ग उद्या बंद राहणार आहेत—

  • छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी चौक — फक्त आपत्कालीन वाहनांना परवानगी

  • नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पी. रामचंदानी मार्ग पूर्णपणे बंद

  • रिगल जंक्शनकडे येणारी वाहने शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड आणि बी.के. बोमन बेहराम रोडकडे वळवली जाणार

  • पी. रामचंदानी मार्गावरील वाहतूक अल्वा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड आणि जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवण्यात येईल

  • अॅडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बेस्ट बस थांबे बद राहतील

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान मोदी दुपारी २.१५ वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर २.३० वाजता लोकभवन येथे मोदी आणि मॅक्रोन यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता हॉटेल ताज येथे दोन्ही नेते विविध उद्योगसमूहांच्या सीईओंसोबत राऊंडटेबल चर्चेत सहभागी होतील. यानंतर सायंकाळी ६.३० वाजता ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात भव्य इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.मुंबई पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि शक्यतो सार्वजनिक वाहतूक सेवा वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच कार्यक्रमाच्या वेळेत दक्षिण मुंबईकडे जाणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे भारत-फ्रान्स संबंधांना नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, वाहतुकीतील बदलांमुळे मुंबईकरांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com