Mohan Bhagwat
ताज्या बातम्या
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून तीन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून तीन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mohan Bhagwat) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून तीन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत. 22 नोव्हेंबर रोजी ते मणिपूर येथून प्रस्थान करतील.
या दौऱ्यादरम्यान मोहन भागवत विविध गटांशी संवाद साधणार असून आरएसएस प्रमुखांच्या कार्यक्रमात काही नागरिक, स्थानिक आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी आणि युवा नेते यांचा समावेश असेल.
मणिपूर येथे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या जातीय हिंसाचारानंतर प्रथमच मोहन भागवत यांचा हा दौरा नियोजित करण्यात आला आहे. मोहन भागवत २० नोव्हेंबर रोजी गुवाहाटीहून मणिपूरला जाणार आहेत. या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summery
मोहन भागवत आजपासून 3 दिवस मणिपूर दौऱ्यावर
आज मोहन भागवत गुवाहाटीहून मणिपूरला जाणार
दौऱ्यादरम्यान भागवत विविध गटांशी साधणार संवाद
