सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आजपासून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपूरच्या भाऊजी दप्तरी शाळेत जाऊन त्यांनी मतदान केलं आहे.

यावेळी मोहन भागवत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोहन भागवत म्हणाले की, हे आपलं कर्तव्य आहे आणि आपला अधिकार आहे. मतदारांनी येत्या 5 वर्षाकरता आपण आपल्या देशाचं भाग्य निर्धारित करतो. म्हणून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. पहिलं काम मी जे केलं उठल्यावर ते मतदान केलं. असे मोहन भागवत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com