Mohit Kamboj and Zeeshan Siddiqui: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मोहित कंबोज यांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे. त्यांनी चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सिद्दीकींचं स्टेटमेंट तोडून वापरलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. चार्जशीटमध्ये माझं नाव नाही असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. सिद्दीकींचं स्टेटमेंट तोडून वापरलं जातेय, झिशान सिद्दीकीने बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्यावेळी हल्ला करण्यात आला, ज्यावेळी ती घटना झाली. त्यादिवशी बाबा सिद्दीकी यांचे माझ्यासोबत बोलणे झाले होते.

बाबा सिद्दीकी आणि मी बोलत असायचो, बाबा सिद्दीकींसोबत जी घटना झाली ती माझ्यासाठी धक्कादायक आहे. मी आणि ते वांद्र्याचे रहिवाशी असल्याने बोलायचो तसेच आम्ही NDA चे घटक असल्याने राजकीय मुद्द्यांवर ही आमच्या चर्चा व्हायच्या.

मी सांगू इच्छितो की बाबा सिद्दीकी यांच्या सोबत जी घटना घडली ते बाहेर यायला हवे तसेच कारवाई झालीच पाहिजे मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावे, आणि त्यांच्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागिणी देखील मोहित कंबोज यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com