भयंकर! आईनेच केला मुलीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; 24 वर्षीय प्रियकरासोबत महिला अटकेत

आईला आणि तिच्या प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी सिंहगड परिसरातून अटक केली आहे
Published by :
Rashmi Mane

प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या सख्या आईला आणि तिच्या प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी सिंहगड परिसरातून अटक केली आहे. 35 वर्षीय महिला आरोपी ही पुण्यातील बिबेवाडी परिसरात राहायला असून तिचा 24 वर्षीय प्रियकर या दोघांचे प्रेम संबंध होते. या सगळ्याची माहिती पीडित अल्पवयीन तरुणीने घरमालकिणीला सांगितल्यानंतर चिडलेला प्रियकर आणि तिच्या आईने 13 वर्षाच्या पीडितीचे अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल केले. यानंतर ते दोघे फरार झाले होते. या दोन्ही आरोपींचा शोध बिबवेवाडी पोलिसांनी घेत दोघांना अटक केली आहे.

मुलीने आई आणि तिचा प्रियकर गुरुदेव स्वामी यांच्या नात्याबद्दल घरमालकिणीला माहिती दिली. त्या गोष्टीचा मनात राग धरून आई व प्रियकराने मुलीशी घरी कोणी नसताना छेडछाड करून जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ मुलीच्या आईने नातेवाईकांना बहिणींना, वडिलांना पाठवून तीची बदनामी केली. व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर दोघेही फरार झाले. बिबवेवाडी पोलिसांकडून फरार असलेल्या आई आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com