पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला पुणे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला पुणे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पलमधील फेरफार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आता आई समोरच आईसमोरच अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या आईला अखेर इतक्या दिवसांनी अटक करण्यात आली. या प्रकरणात किती तत्पर कारवाई होते याचे उदाहरण आहे. सदर प्रकरणात हस्तक्षेप करून राजकीय दबाव आणणाऱ्या आमदाराबाबत पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे? आमदारावर कधी कारवाई होणार? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. म्हणूनच या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली तरच सर्व आरोपींना कठोर शिक्षा होवू शकेल.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, नाही तर सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे लवकरच हे सर्व आरोपी पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा पैसा आणि राजकीय ताकद ची मस्ती दाखवण्यात मोकळे होतील. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com