Sindhudurg
SindhudurgTeam Lokshahi

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ, भगीरथ यांच्या बरोबर सामंजस्य करार

मोबाईल सारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक योजना आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तशा योजना नाहीत. परंतु आता शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ, भगीरथ यांच्या बरोबर सामंजस्य करारातून गोठ्यांची योजना राबविण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला मिळाली हे आपले भाग्य आहे.

प्रसाद पाताडे|सिंधुदुर्ग : मोबाईल सारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक योजना आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तशा योजना नाहीत. परंतु आता शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ, भगीरथ यांच्या बरोबर सामंजस्य करारातून गोठ्यांची योजना राबविण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला मिळाली हे आपले भाग्य आहे. त्यापेक्षाही यातून दुधाळ जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात गोट्यांची निर्मिती होणार आहे! व दूध उत्पादनाबरोबरच शासनाच्या 'नरेगा' योजने मधून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढेल व रोजगार निर्मिती होणार असल्याने या नाविन्यपूर्ण करारात सहभागी होण्याचा आपल्याला आनंद झाला आहे! असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद,गोकुळ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्यामध्ये शेतकऱ्यां साठी पशुसंवर्धन विषयक गोठा बांधणी, कृत्रीम रेतन सेवा योजनाराबविणे व बायोगँस उभारणी, असे तीन सामंजस्य करार गुरुवारी झाले.सिंधुदुर्ग जिल्हा बँक,अध्यक्ष मनीष दळवी, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गोकुळचे कार्यकारी संचालक, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदी उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी तिन्ही योजनाबाबत विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांनी दुग्ध उत्पादनासाठी दिलेल्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी कौतुक केले.

जिल्ह्यातील दूध उत्पादनाचा वेग एका वर्षात दुपटीने वाढला आहे जिल्हा विशेष शेतकऱ्यांनी जिल्हा बँक करत असलेल्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन-चार वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिवशी एक लाख लिटर दूध संकलनाचा प्रयत्न पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हा बँक कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावर योजनेसाठी आणखी बळकटी देण्याकरता जिल्हा बँकेच्या साथीला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर पुढाकार घेतला आहे. गोकुळ दूध उत्पादक संघ आणि या जिल्ह्यात अनेक वर्ष काम करणाऱ्या भगीरथ प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेने ही योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे या योजनेला आता चांगली बळकटी मिळाली आहे. या योजनेला सामंजस्य करारातून याला प्रारंभ होत आहे. आदर्श गोठा,कृत्रिम रेतन व बायोगॅस निर्मिती असा शाश्वत विकास या योजनेतून जिल्ह्यात निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालणारी दुग्ध उत्पादनाला बळकटी देणारी व जिल्ह्यात रोजगाराची निर्मिती करणारी ही योजना राज्यात आदर्शवत ठरेल व राज्यभर ही चळवळ निर्माण होईल असा विश्वास या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यांसाठी घेतलेला पुढाकार व जिल्हा बँकेला दिलेले सहकार्य कौतुकास्पद असून शेतकऱ्यांसाठी ते महत्त्वाचा आहे त्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

Sindhudurg
अधिवेशनापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटतील- बच्चू कडू यांचा मोठा दावा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com