Sanjay Raut Health Update : मोठी अपडेट! संजय राऊतांची तब्येत खालावली, पुढील उपचारांसाठी रुग्णलयात दाखल, काय झालं राऊतांना?
थोडक्यात
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
राऊतांची तब्येत खालावली असल्याचे समोर आले आहे.ॉ
पुढील उपचाऱ्यांसाठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
Sanjay Rauat शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राऊतांची तब्येत खालावली असल्याचे समोर आले आहे. त्यांना पुढील उपचाऱ्यांसाठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृतीत बिघाड झाल्याची आणि उपचार सुरु असण्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघडली आहे
दरम्यान संजय राऊतांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि जीवनापासून दूर आहेत. अशातच आता संजय राऊत हे रूटीन चेकअपसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. आज आवश्यक त्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत हे भांडूप येथील मैत्री निवास्थानी विश्रांती घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
