Sanjay Raut X post
Sanjay Raut X post Sanjay Raut X post

Sanjay Raut X post : खासदार संजय राऊतांनी केलेलं ट्वीट चर्चेत; राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतानाच, सध्या महायुतीमध्ये नाराजीचा सुर असल्याचा सध्या जोरदार बोलबाला आहे. महायुतील नेते नाराजीचा सुर असल्याचे सांगत असले तरी, विरोधकांकडून मात्र जोरदार टीका केल्या जाते आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतानाच, सध्या महायुतीमध्ये नाराजीचा सुर असल्याचा सध्या जोरदार बोलबाला आहे. महायुतील नेते नाराजीचा सुर असल्याचे सांगत असले तरी, विरोधकांकडून मात्र जोरदार टीका केल्या जाते आहेत. यात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एक पोस्ट ट्विट केली आहे, ज्यामुळे राऊतांचा नेमका रोख कुणाकडे? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.

संजय राऊत यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत यांना तब्येत बिघडल्याने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भांडुपच्या फोर्टिस रुग्णालयात संजय राऊत यांना अॅडमिट करण्यात आले असून रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत हे त्यांच्या घरी परततील आणि तिथेच बेड रेस्ट घेतील. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी एक निवेदन जारी करून आपली तब्येत ठीक नसल्याने काही दिवस कार्यकर्ते आणि पत्रकारांशी बोलणार नसल्याचे सांगितले होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना बेड रेस्ट देण्यात आली आहे.

कधी होणार सक्रीय ?

संजय राऊत यांना जरी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी ते काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूरच राहणार आहे. त्यांनी द्विट करून आपण आता नवीन वर्षात भेटणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं जरी राऊत यांना डिस्चार्ज मिळाला असली तरी ते लगेचच माध्यमांना प्रतिक्रिया देतील. किंवा सकाळची पत्रकार परिषद सुरू करतील याची शक्यता नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com