PM Narendra Modi | Shrikant Shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या
श्रीकांत शिंदेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; भेटीनंतर म्हणाले, सहवासाची संधी...
सहपरिवार खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
देशासह राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच नवनवीन घटना घडत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा दिसून आला. त्याच भेटीचा प्रसंग त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
काय म्हणाले भेटीनंतर श्रीकांत शिंदे?
जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे,त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हाजेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात. आजही असंच झालं! मा.पंतप्रधान @narendramodi जी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. असे त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. मात्र, याभेटीमागचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.