एसटी कर्मचारी विनावेतन, कामगार संघटना आक्रमक

एसटी कर्मचारी विनावेतन, कामगार संघटना आक्रमक

एसटी महामंडळाने कामगारांचे वेतन थकवल्यामुळे आता सर्वच कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एसटी महामंडळाने कामगारांचे वेतन थकवल्यामुळे आता सर्वच कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. एसटी कामगारांची मान्यता प्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेने परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना काल अवमान याचिका बजावण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे.

त्यानंतर महामंडळातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयीन अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज एसटी कामगारांचे वेतन होण्याची शक्यता आहे.

जानेवारीची 10 तारीख उलटून गेल्यानंतरही वेतन मिळाले नसल्याचा आरोप महाराष्ट्र ST employees एसटी कामगार संघटनेने केला आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रि-सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने मान्य केले होते. मात्र, या महिन्याची 10 तारीख उलटली असतानाही सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचार्‍यांना वेतन मिळाले नाही, त्यामुळे एसटी कामगार संघटना आक्रमक झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com