Jio New Plan : मुकेश अंबानींचे ग्राहकांना खास गिफ्ट ; 50 GB मोफत...

Jio New Plan : मुकेश अंबानींचे ग्राहकांना खास गिफ्ट ; 50 GB मोफत...

रिलायन्स जिओकडून कोट्यवधी प्रीपेड अन् पोस्टपेड यूजरला मोफत क्लाउड स्टोरेज दिलं जात आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

तुमचंदेखील क्लाउड स्टोरेज भरलं आहे का? तसेच मेल येण बंद झालय? तुम्हीदेखील या समस्येला कंटाळला असाल याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी जाणून घ्या. रिलायन्स जिओकडून कोट्यवधी प्रीपेड अन् पोस्टपेड यूजरला मोफत क्लाउड स्टोरेज दिलं जात आहे. गुगल यूजर्सला अकाऊंट बनवल्यानंतर 15 जीबी डाटाची मर्यादा क्लाउडवर मोफत दिली जात आहे. परंतु मुकेश अंबानी यांनी जिओवर ही मर्यादा तीनपट जास्त दिली आहे. यामुळे जिओ युजर्सला फायदा झाला असून गुगलची झोप उडाली आहे.

गूगलच्या 15 जीबी मर्यादेत यूजरला जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोज आदी अ‍ॅप्सचा वापर करावा लागतो. गुगल ड्रायव्ह स्टोरेजसाठी यूजरला वेगळं स्टोरेज मिळत नाही. तुम्ही Gmail मध्ये जास्त स्टोरेज वापरल्यावर ड्राइव्हर कमी स्टोरेज मिळतं. कधी कधी तर मेल सुद्धा येण बंद होतं. परंतु मुकेश अंबानी यांनी प्रीपेड यूजर्सला 299 रुपयांचा प्लॅनवर मोफत 50 जीबी क्लाउड स्टोरेजची ऑफर दिली आहे. प्रीपेड प्लॅनच नाही तर पोस्टपेड प्लॅनमध्येही क्लाउड स्टोरेजचा फायदा दिला जातोय. त्यामुळे आता लवकरच जिओच्या या प्लॅनचा तुम्ही लवकरात लवकर फायदा घ्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com