Shirdi
ShirdiTeam Lokshahi

अनंत अंबानींची शिर्डी साई संस्थानला तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी

या आधी ऑक्टोबर महिन्यात अनंत अंबानी यांनी शिर्डी जाण्याचा दौऱ्याचं नियोजन केलं होतं. मात्र महिन्याभरात दोन वेळा त्यांना वेगवेगळ्या कारणामुळे दौरा रद्द करावा लागला होता.
Published by :
Sagar Pradhan

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी दिवाळीनिमित्त शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. दरम्यान, अनंत अंबानी यांनी शिर्डी साई संस्थानला तब्बल 1 कोटी 51 लाख रुपयांची देणगी दिली. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणगीचा चेक सुपूर्द केला. याबाबत मंदिर समितीच्या वतीने अंबानी यांचे आभारही मानण्यात आले.

Shirdi
आता जनताच ठरवेल कोण पाकिस्तान आणि कोण भारत, पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

साई संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी अनंत अंबानी यांचे स्वागत केले. अंबानी हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित हाेते. अंबानी यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या महिनाभरात दोनवेळा त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला होता.त्यानंतर त्यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com