Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaLadki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : गुड न्युज! लाडक्या बहिणीचा ऑक्टोबरचा हप्ता उद्यापासून खात्यात

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्‍या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांना उद्यापासून वितरित होणार आहे. ###
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांना उद्यापासून वितरित होणार

  • महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

  • आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून, या योजनेला 'महिला सक्षमीकरणाची क्रांती' म्हणून संबोधले.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्‍या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांना उद्यापासून वितरित होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून, या योजनेला 'महिला सक्षमीकरणाची क्रांती' म्हणून संबोधले. योजनेच्या अंतर्गत, पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात, ज्यात शेतकरी महिलांना पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थींना दरमहा 500 रुपये मिळतात.

सर्व लाभार्थ्यांना त्यांचा आधार संलग्नित बँक खात्यात हप्ता जमा होईल. योजनेच्या प्रक्रियेत तांत्रिक पारदर्शकता राखण्यासाठी, ई-केवायसी करणे आवश्यक आहे. आदिती तटकरे यांनी महिलांना 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मध्ये सुरू झाली आणि तेंव्हापासून हे पैसे दिले जात आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी महिलांना योजना संकेतस्थळावर https://ladakibahin.maharashtra.gov.in जाऊन केवायसी पूर्ण करण्याचा आग्रह करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com