ताज्या बातम्या
Mulund: मुलुंड नाही तर नवीन धारावी, झळकले बॅनर, पोलिसांकडून बॅनर्स उतरवण्याची कारवाई
मुलुंडमध्ये 'मुलुंड नाही तर नवीन धारावी' बॅनर झळकले, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि पोलिसांकडून बॅनर्स उतरवण्याची कारवाई.
मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयाच्या लगत असलेल्या मिठागराच्या साडे 58 एकर जमिनीवर धारावीतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलं जाणार आहे. याला प्रकल्पला मुलुंडकरांनी वेळोवेळी विरोध देखील केला होता. परंतु, अखेर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी मिठागराची ही जागा अदानीच्या प्रोजेक्टसाठी वर्ग करण्यात आली.
त्यानंतर मुलुंडमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन होणार यामुळे अखेर आता मुलुंडमध्ये 'मुलुंड नाही तर नवीन धारावी', अशा आशयाचे बॅनर झळकवले गेले आहे. मुलुंडचे हे नामांतरण नाकर्ते राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्या शुभहस्ते होणार असल्याची उपहासात्मक टीका, या बॅनरवर करण्यात आलेली आहे. मुलुंड मध्ये विविध ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले होते, त्यानंतर पोलिसांनी बॅनर्स उतरविण्यास सुरुवात केली आहे.