Mumbai and new Mumbai airport will connected by metro cm fadnavis did big announcement
Mumbai and new Mumbai airport will connected by metro cm fadnavis did big announcement

Cm Fadnavis Did Big Announcement : परवानगी मिळाली! मुंबई-नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडले जाणार; प्रोजेक्टचा खर्च किती

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या नव्या मेट्रो मार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक आणि उत्साहवर्धक बातमी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या नव्या मेट्रो मार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे 35 किलोमीटर लांबीची ही मेट्रो लाईन शहरातील प्रवास अधिक वेगवान आणि सोपा करणार आहे.

राज्य सरकारचा प्रयत्न आहे की हा प्रकल्प येत्या साडेतीन वर्षांत पूर्ण व्हावा. या मेट्रोमुळे केवळ दोन विमानतळांमधील प्रवासच सुलभ होणार नाही, तर मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या मार्गावर एकूण 20 स्थानके असतील. त्यापैकी काही मेट्रो भुयारी तर काही उड्डाणपुलावरून धावणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनससारखी महत्त्वाची ठिकाणेही या मेट्रोशी जोडली जाणार आहेत, त्यामुळे रोजच्या प्रवाशांनाही मोठा फायदा होईल.

हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून साकारला जाणार असून यासाठी सुमारे 17 ते 18 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूणच, ही मेट्रो मुंबईच्या भविष्यातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारी ठरणार आहे.

थोडक्यात

  1. मुंबईकरांसाठी दिलासादायक आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे.

  2. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या नव्या मेट्रो मार्गाला हिरवा कंदील मिळाला आहे.

  3. ही मेट्रो लाईन सुमारे 35 किलोमीटर लांबीची असणार आहे.

  4. या मार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबईमधील प्रवास अधिक वेगवान आणि सोपा होणार आहे.

  5. विमानतळांदरम्यान थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com