School Girl Harassment : विलेपार्ले-तीन शाळकरी मुलींचा विनयभंग, पोलिसांकडून स्कूल व्हॅन चालकाला अटक

मुंबईच्या जुहू परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विलेपार्ले येथील नामाकिंत शाळेच्या व्हॅन चालकाने तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडला आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबईच्या जुहू परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विलेपार्ले येथील नामाकिंत शाळेच्या व्हॅन चालकाने तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. घडलेल्या घटनेप्रकरणी एका महिलेने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेमुळे पालकांनी शाळेवर आणि व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

विलेपार्ले येथील एका नामांकित शाळेतील व्हॅन चालकाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी सांयकाळी आरोपी व्हॅनसह उभा होता. तक्रारदार माहिलेच्या मुलीला व्हॅनमध्ये बसवताना त्याने चुकीचा स्पर्श केला आणि गैरवर्तन केले. ही घटना पीडितेने तीच्या आईला सांगितली त्यानंतर आणखी दोन मुलींसोबत आणि चाळे केल्याचे उघडकीस आले.

थोडक्यात

  • विलेपार्ले परिसरात तीन शाळकरी मुलींचा विनयभंग.

  • स्कूल व्हॅन चालकावर विनयभंग केल्याचा आरोप..

  • जुहू पोलिसांकडून संबधीत स्कूल व्हॅन चालकाला अटक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com