Chinchpokli Chintamani Patpujan
: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात! चिंचपोकळीच्या   चिंतामणीचा पाटपूजन सोहळा

Chinchpokli Chintamani Patpujan : मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा

मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात: चिंचपोकळीतील 'चिंतामणी'चा पारंपरिक सोहळा
Published by :
Shamal Sawant
Published on

गणेशभक्तांच्या मनात उत्सवाची चाहूल लागली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीला शहरभरात वेग आला असतानाच, आज चिंचपोकळीच्या प्रसिद्ध ‘चिंतामणी’ गणपती मंडळाचा पारंपरिक पाठपूजन सोहळा पार पडणार आहे. याच संकेताने गणेशोत्सवाची औपचारिक सुरुवात होते, त्यामुळे गणेशभक्तांमध्ये या सोहळ्याबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय.

चिंचपोकळीतील ‘चिंतामणी’ गणपती हे मुंबईतील एक अत्यंत लोकप्रिय आणि श्रद्धास्थानी गणपती स्थान आहे. गेली अनेक दशके इथला गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक उपक्रमांसाठी ओळखला जातो. आजचा पाठपूजन सोहळा हा मंडळाच्या वर्षभराच्या कार्याचा प्रारंभ मानला जातो आणि यानंतरच मूर्ती बनवण्याचे, सजावटीचे व इतर नियोजनाचे काम औपचारिकपणे सुरू होते.

सोहळा आज सायंकाळी चार वाजता चिंचपोकळी परिसरात पार पडणार असून मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने या पूजनात सहभागी होणार आहेत. पाठपूजनानंतर ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत गणेशभक्तांचा जल्लोष दिसण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com