मुंबई हादरली; गतिमंद मुलीवर ३ अल्पवयीन मुलांनी केला अत्याचार

मुंबई हादरली; गतिमंद मुलीवर ३ अल्पवयीन मुलांनी केला अत्याचार

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. गतिमंद मुलीवर ३ अल्पवयीन मुलांनी केला अत्याचार केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. गतिमंद मुलीवर ३ अल्पवयीन मुलांनी केला अत्याचार केला आहे. पीडित मुलगी ही शौचालयासाठी गेली असताना तीन मुलांनी तिला जबरदस्ती शौचालयात नेले. यातील एका मुलाने तिच्यासोबत जबरदस्ती अत्याचार केला, तर इतर आरोपींनी त्याचे मोबाईल चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

हा व्हायरल केलेला व्हिडिओ मुलीच्या भावाने पाहिला आणि घरातल्यांना ही घटना सांगितली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तीन विधीसंघर्ष मुलांविरोधात 376, 376 (जे) (एल), 323, 500, 34 सह कलम 4 पोक्सो सह कलम 66(ई) 67(बी) आय टी अॅक्ट अंतर्गग गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिनही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने तिघांची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com