Hardik Pandya
Hardik Pandya

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याचं मोठं विधान; म्हणाला, "सर्वांना वाटत होतं की..."

दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात मुंबईच्या रोमारियो शेफर्डने १० चेंडूत ३९ धावा कुटल्या. तसंच अन्य फलंदाजांनी केलेल्या धावसंख्येच्या जोरावर मुंबईने दिल्लीचा २९ धावांनी पराभव केला.
Published by :

दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात मुंबईच्या रोमारियो शेफर्डने १० चेंडूत ३९ धावा कुटल्या. तसंच अन्य फलंदाजांनी केलेल्या धावसंख्येच्या जोरावर मुंबईने दिल्लीचा २९ धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबईने प्रथम फलंदाजी करत २३४ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्लीने २०५ धावा केल्यानं त्यांचा पराभव झाला. सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबईने पहिला सामना जिंकला. तर दिल्लीला पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दिल्लीचा संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर पोहोचला आहे.

पहिल्या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या काय म्हणाला?

हे खूप मेहनतीचं काम होतं. आम्हाला आमच्या मनाला साफ करायचं होतं आणि विश्वास जिंकायचा होता. ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकमेकांवर विश्वास ठेवणं आणि त्याचं समर्थन करणं गरजेचं आहे. आम्हाला एक विजयाची आवश्यकता आहे, असं सर्वांना वाटत होतं. संघाने खूप चांगली सुरुवात केली. संधी मिळताच सर्वांनी मोलाचं योगदान दिलं. ते पाहून आनंद झाला. रोमारियोच्या आक्रमक फलंदाजीमुळे जिंकू शकलो. मी योग्यवेळी गोलंदाजी करेन. आता आम्ही सर्वकाही कव्हर केलं आहे.

रोहित शर्माने २७ चेंडूत ४९ धावा, इशान किशनने २३ चेंडूत ४२ धावा करून पहिल्या विकेटसाठी ८० धावा केल्या आणि मुंबईला दमदार सुरुवात मिळाली. हे फलंदाज बाद झाल्यानंतर टीम डेव्हिडने २१ चेंडूत नाबाद ४५ धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पंड्याने ३३ चेंडूत ३९ धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्ससाटी पृथ्वी शॉने ४० चेंडूत ६६ धावा, अभिषेक पोरेलने ३१ चेंडूत ४१ धावा केल्या. विशेष म्हणजे ट्रिस्टन स्टब्सने २७ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीनं ७१ धावांची तुफानी खेळी केली. मुंबईसाठी गेराल्ड कोएट्जीने ३४ धावा देत चार विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने २२ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com