Mumbai Local New Designs : मुंबई लोकलसाठी तीन नवीन डिझाईन; रेल्वेमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा

Mumbai Local New Designs : मुंबई लोकलसाठी तीन नवीन डिझाईन; रेल्वेमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा

मुंबई लोकलसाठी तीन नवीन डिझाईन; दरवाजे आणि व्हेंटीलेशनवर चर्चा
Published by :
Shamal Sawant
Published on

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील दुर्घटनेनं मुंबईकरांच्या जीवाचा प्रश्न उभा राहीला आहे. मुंबईत दररोज 7 प्रवासी लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आलं आहे. अशातच आज मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेत 13 प्रवासी ट्रेनमधून पडले असून 4 जणांनी आपला जीव गमावला आहे.

त्याच अनुषंगाने आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील लोकल ट्रेनच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यामध्ये, मुंबईतील लोकल ट्रेनला दरवाजे असावेत की नसावे, यावर प्रामुख्याने चर्चा झाली असून यातून 3 पर्याय समोर आलेत. मुंबईत धावणाऱ्या नॉन एसी लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे असावेत की नसावेत, याच अनुषंगाने बैठकीत महत्त्वाची चर्चादेखील करण्यात आली आहे.

रेल्वेमंत्र्यांसोबत आज झालेल्या बैठकीनंतर नव्याने येणारी ही मॉडेल ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार आहे. त्यासाठी, मुंबई लोकल ट्रेनसाठी तीन नवीन डिझाईन बनवण्यात येणार आहेत.

1. लोकल ट्रेनच्या दरवाज्यामध्ये लूव्हर्स म्हणजे हवा खेळती राहणाऱ्या पट्ट्या बसवण्यात येणार, त्यामुळे व्हेंटीलेशन हवा खेळती राहू शकेल.

2. रेल्वे डब्ब्याच्या छतावर व्हेंटीलेशन युनिट्स बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे बाहेरुन ताजी हवा लोकलच्या डब्ब्यात येऊ शकेल.

3. लोकल ट्रेनच्या कोचमध्ये वेस्टीब्यूल्स बसविण्यात येतील, ज्याने एका कोचमधून प्रवासी दुसऱ्या कोचमध्ये सहजपणे जाऊ शकेल. त्यातून ट्रेनमधील गर्दी स्वाभाविकपणे मोकळी होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com