मुंबई मराठी पत्रकार संघाकडून ‘लोकशाही’च्या हत्येचा तीव्र निषेध!

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून ‘लोकशाही’च्या हत्येचा तीव्र निषेध!

लोकशाही वाहिनीने दाखविलेल्या किरीट सोमैया यांच्या चित्रफितीचा सूड उगवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वाहिनीवर घातलेली ७२ तासांची बंदी म्हणजे लोकशाहीची हत्या आहे.
Published by :
Team Lokshahi

लोकशाही वाहिनीने दाखविलेल्या किरीट सोमैया यांच्या चित्रफितीचा सूड उगवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वाहिनीवर घातलेली ७२ तासांची बंदी म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. सरकारच्या या कारवाईचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र शब्दात निषेध करत आहे.

वास्तविक जी चित्रफित दाखविली गेली ती बनावट असल्याचे खुद्द सोमैया यांनी देखील म्हटलेले नाही. मग लोकशाही वाहिनीवर कारवाई कशासाठी? सरकारने ही बंदी त्वरीत मागे घ्यावी तसेच प्रसार माध्यमांची मुस्काटदाबी थांबवावी अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करीत आहे. या संकट काळात मुंबई मराठी पत्रकार संघ लोकशाही वाहिनी आणि तिचे संपादक कमलेश सुतार यांच्या मागे ठामपणे उभा आहे.

नरेंद्र वि. वाबळे संदीप चव्हाण

अध्यक्ष         कार्यवाह

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com