Kandivali Crime | Crime News | Kandivali Police
Kandivali Crime | Crime News | Kandivali PoliceTeam Lokshahi

mumbai crime : एकाच बंगल्यात सापडले चार मृतदेह

आई आणि मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय, बाकी दोघांनी केली असवी आत्महत्या
Published by :
Shubham Tate
Published on

mumbai crime : कांदिवली उपनगरातील त्यांच्या बंगल्यात एक महिला आणि तिच्या मुलीचे मृतदेह सापडले, तर आणखी एका मुलीचे आणि एका पुरुषाचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. बुधवारी रात्री उशिरा चार मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आई आणि मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे, तर ज्यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत त्यांनी आत्महत्या केली असावी. (mumbai mother daughter found dead in bungalow bodies of another daughter and one man found hangingr)

Kandivali Crime | Crime News | Kandivali Police
डॉक्टर आणि क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांना मोठा झटका, तुमच्यावरही होईल परिणाम

कांदिवली रेल्वे स्थानकाजवळील दळवी बंगला येथे ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. किरण दळवी, त्यांच्या दोन मुली मुस्कान आणि भूमी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे आहेत, असे त्यांनी सांगितले. भूमी आणि शिवदयाल यांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिक तपशीलवार माहितीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

Kandivali Crime | Crime News | Kandivali Police
रिक्षा चालक ते राज्याचे मुख्यमंत्री, असा राहिला एकनाथ शिंदेंचा प्रवास

कांदिवली परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. मात्र पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com