Plastic Ban: कापडी पिशवी वापरा, नाहीतर भरावा लागणार एवढ्या रुपयांचा दंड
प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या अविघटनशील कचऱ्याचा सागरी व वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास 50 मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्या.
केंद्र सरकारने सुद्धा प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर जुलैमध्ये राज्य सरकारने बंदी घातली होती. त्यानंतर 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने प्लास्टिक वापराबाबत निर्बंध कडक केले.
15 ऑगस्टनंतर प्लॅस्टिक पिशवी वापरल्यास मुंबईत पाच हजारांचा दंड घेतला जाणार आहे. दुकानदारांसह फेरीवाले आणि ग्राहकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचे स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे. तीन अधिकारी, एक पोलीससुद्धा असणार आहेत.