Mumbai Police
Mumbai PoliceTeam Lokshahi

भोंग्याविरोधात मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; नियम मोडल्याने 2 मशिदींवर गुन्हे

मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर मनसेनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Sudhir Kakde

मुंबई : राज्यात भोंग्यावरून (Azan Loudspeaker) वातावरण तापलेलं असताना, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन न करता अजान वाजवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन गुन्हे नोंदवले आहेत. मुंबई पोलिसांनी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच अजान वाजवण्याला परवानगी दिली आहे. या वेळेत सुद्धा न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांनुसार भोंग्याचा आवाज ठेवावा लागणार आहे. मात्र वांद्रेच्या नुराणी मशिद बाजार येथे पहाटेची अजान पुकारल्या प्रकरणी गुरूवारी कलम 188, भादवीसह 37(1),(3) 135 महाराष्ट्र पोलिस अॅक्ट, तसेच 1951 सह 33 आर (3), ध्वनी प्रतिबंधक नियम भादवी नुसार एकावर गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Police
अंबरनाथमध्ये बिल्डरने स्वत:वरच गोळीबार करण्याचा रचला डाव; एक चूक झाली अन्...

सांताक्रूझच्या लिंक रोडवरील कबरस्तान मशिद येथे भोंग्याची परवानगी घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या मर्यादांचं पालन न केल्याप्रकरणी दोघांवर कलम 188,34 भादवि,सह 33 (1)म पो का 1951,33 (1)(3) म पो का ,131 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai Police
वसंत मोरेंच्या महाआरतीला राज ठाकरे हजेरी लावणार का?

मुंबई पोलिसांनी हे गुन्हे दाखल केल्यानंतर मनसेनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. आवाजाच्या नियमांचं उल्लंघन केल्याने महाराष्ट्रात मशिदींच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल झाला, राजसाहेबांचा इफेक्ट यातून जाणवतोय. सरकारला नाईलास्तव का होईना हा निर्णय घ्यावा लागला. राजसाहेबांमुळे धर्माधर्मातलं तेढ सुटते आहे हेच महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com