मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा मराठी बाणा, मराठी कामकाज करण्याचे आदेश

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत राजभाषा विधेयक मंजूर झाले... या विधेयकानुसार राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये कामकाजाची भाषा मराठी होणार आहे...
Published by :
Team Lokshahi

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत राजभाषा विधेयक मंजूर झाले... या विधेयकानुसार राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये कामकाजाची भाषा मराठी होणार आहे... अजून या निर्णयाची अनेक ठिकाणी अंमलबाजवणी नाही... परंतु मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मराठी बाणा दाखवला आहे...

मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा कारभार घेताच विवेक फमसळकर यांनी मराठी बाणा दाखवला. आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यावर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत इतर भाषेत बोलण्याचा आग्रह पत्रकारांनी केला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना सुनावत मराठी बाणा दाखवला. त्यांचा हाच मराठी बाणा कामकाजातून दिसत आहे. योजनेची माहिती देणे, दूरध्वनीवर चर्चा करणे, वरिष्ठ स्तरावरील बैठकीत मराठीच ते बोलतात आणि अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.

विवेक फणसळकरांचा मराठी बाणा

  • टि्वटरवरील पोलिस आयुक्त, मुंबई पोलिसांचे अकाऊंट केले मराठीत

  • आयुक्तांना पाठवला जाणारा अहवाल मराठीत करा.

  • इतर भाषेतील अहवाल, स्वीकारणार नाहीत.

  • बिगर मराठी अधिकाऱ्यांनी मराठीत संवाद साधा.

  • अधिकाऱ्यांनी मराठी भाषा व्यवस्थित शिकावी.

  • दैनंदिन कामकाज मराठीतून करावे.

  • गणवेशावरील पाटी मराठीत असावी.

  • पोलिस ठाण्याबाहेर फलक मराठीत असावे.

राज्य विविधमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर मुंबई पोलिस दलामध्ये मराठी भाषेचा वापरावर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. पोलिस उपायुक्त मुख्यालय 2 चे अधिकारी दक्षता अधिकारी असणार आहे. पोलिस आयुक्तांचा हाच मराठी बाणा सर्वच अधिकाऱ्यांनी घेतल्यास संपुर्ण शासकीय कामकाज मराठीत होण्याचा दिवस लांब नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com