ताज्या बातम्या
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळ्याजवळ पुन्हा दरड कोसळली
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळ्याजवळ आणखी छोटी दरड कोसळली आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळ्याजवळ दरड कोसळली आहे. या दरडीमुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, ही वाहतूक आता सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.
दरड कोसळल्यामुळे तळेगाव टोलनाक्यापासून वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ रात्री 22.35 च्या सुमारास दरड कोसळली आहे. यामुळे मुंबईला येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. रात्रीच्या सुमारास ही पहिली दरड कोसळली.
डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेनवर पडलेला आहे. यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक थांबलेली आहे. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.